Share

मंत्रिमंडळ देणार काळ्या फिती लावून सीमावासीयांना पाठिंबा- एकनाथ शिंदे

Published On: 

मुंबई– भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेला. त्यामुळे या सीमावर्ती भागामध्ये नेहमीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असतो. त्याचा निषेध म्हणून सीमा भागातील मराठी भाषिक ५७ सालापासून १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. त्याला राज्य सरकारकडून देखील पाठिंबा देण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून १ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्री काळ्या फिती लावून काम करणार आहेत. राज्याचे नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती. तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या ८६५ गावांमधील मराठी भाषिकांवर कर्नाटक राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय, अत्याचार होत आहेत. भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेला. त्याचा निषेध म्हणून सीमा भागातील मराठी भाषिक ५७ सालापासून १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. त्याला राज्य सरकारकडून देखील पाठिंबा देण्यात येणार आहे.

सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार समर्थपणे उभे आहे. त्यासाठी राज्य सरकारमधील सर्व मंत्री १ नोव्हेंबर रोजी काळी फित लावून कारभार करणार आहेत. सीमा भागातील ८६५ गावात राहणारे मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत आहेत. परंतु कर्नाटक सरकार सातत्याने दडपशाही करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार करत आहे. या दडपशाहीचा निषेध म्हणून सीमावासीयांकडून १ नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्यात येतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!