Share

म्हणूनच मला लोकांनी विधानसभेत पाठविले नाही- वहाडणे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मागील १० वर्षात झाली नाहीत इतकी कामे मी साडेतीन वर्षात केलेली आहेत. नगरपरिषद पुन्हा कोल्हे गटाच्या कब्जात जाऊ नये म्हणून जनतेने मला विधानसभेत पाठविले नाही.

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदारांना असलेले तीस हजारांचे मताधिक्य कुठे गेले? असा जाहीर सवाल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांना केला आहे.

वहाडणे यांनी पत्रकात म्हंटले आहे की, नगरपरिषदेला तुम्ही निधी मिळू दिलेला नाही, ५ नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून मी प्रयत्न करत होतो, पण तुम्ही अडथळेच आणले म्हणून जनतेने तुमचा पराभव केला. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा अडथळे तुम्हीच आणले.

नवीन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करणाऱ्या संस्थेला तुम्हीच हाकलून लावले, त्याच निसर्ग कॅन्सल्टन्सी संस्थेने आता वसुलीसाठी नगरपरिषदेवर दावा ठोकला आहे. अनेक वर्षे नगरपरिषद ताब्यात असताना काही करायचे नाही व सत्ता हातातून गेल्यावर बोंब मारायची, हे डावपेच बंद करा, असे वहाडणे हे कोल्हे यांना म्हटले आहे.

वहाडणे यांनी काढलेल्या या पत्रकामुळे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सतत पुढे येत असल्याने नागरिकांमधून विशेष चर्चिले गेलेले वहाडणे यांना मात्र मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यल्प मते मिळाली होती. परंतु या अपयशाने खचून न जाता त्यांनी कामे सुरूच ठेवली. आता कोल्हे यांना शाब्दिक टोला मारत त्यांनी आपल्या पराजयाचे रहस्यही टिकात्मक पद्धतीने मांडले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!