टीम महाराष्ट्र देशा :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी मुंबई येथील मेट्रो भवनाचे उद्घाटन झाले. भारतीय बनावटीचा कोच, मेट्रो भवन आणि मेट्रो प्रकल्पांच्या उद्धाटन समारंभ यावेळी पार पडला. मात्र मेट्रो प्रकल्पांच्या उद्धाटनाच्या शिळेवर मराठी भाषा नसल्याच्या मुद्यावरून मनसेने पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्राची ‘हिंदी’पणाकडे वाटचाल होत आहे, असे सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारचा तीव्र निषेध केला आहे.
संदीप देशपांडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या बाबत निषेध नोंदवला आहे.आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर #मराठी नाही, काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी मात्र आहे! महाराष्ट्राची हिंदिपणाकडे वाटचाल. राज्य शासनाचा निषेध’ असं ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी केले आहे. या शिळेवर काही मजकूर लिहिण्यात आला आहे.
आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर #मराठी नाही, काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी मात्र आहे!
महाराष्ट्राची हिंदिपणाकडे वाटचाल.
राज्य शासनाचा निषेध pic.twitter.com/dfBrVIqoJm— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 8, 2019
दरम्यान राज्य सरकारच्या मराठीद्वेष्टेपणाचा मनसेने समाचार घेतला आहे. याआधी ही मनसेने दुकानांवरील पाट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती.तसेच ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर हिंदी भाषेतील फलकावरून मनसेनेही ईडीला नोटीस पाठवल्याचाही दावा केला जात होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

