मुंबई : महाराष्ट्र राज्याचा २०२१ -२२ या वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
कोरोना महामारीच्या संकटामुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या बिकट झालेल्या अवस्था सर्वांसमोर आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचा २०२१ -२२ या वर्षाचा अर्थसंकल्पात आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आरोग्य विभागासाठी मोठी घोषणा केलेली आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून आरोग्य विभागासाठी ७५०० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच सिंधुदुर्ग,उस्मानाबाद,रायगड,साताऱ्यात शासकीय मेडिकल कॉलेज उभारण्याची मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. कोरोना संकटामुळे महारष्ट्रातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टीने सरकारने एक मोठे पाऊल उचल्याचे या निमित्ताने दिसत आहे.
“कोरोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्य संस्थांचे बांधकाम श्रेणीवर्धन करुन जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ७५०० कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला असून येत्या चार वर्षात तो प्रकल्पपूर्ण करण्यात येईल. या प्रस्तावात जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्राचे बांधकाम तसेच तालुका स्तरावरील रुग्णालयांचे श्रेणीवर्धन आणि बांधकाम यांचा समावेश आहे”, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या :
- बिदाईला नवरी रडता रडता बेशुद्ध, ऱ्हदयविकाराने जागीच मृत्यू
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
- घायवळ,आंदेकर,मारणे पाठोपाठ आणखी एका कुख्यात गुंडाच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’


