भुवनेश्वर : लग्न झाल्यानंतर नवरीला निरोप देतानाचा प्रसंग भावूक असतो. मात्र, ओडिशा राज्यात एक हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. लग्नानंतर निरोपाच्या वेळी नववधू इतकी रडली की ती बेशुद्ध पडली. काही वेळातच तिला हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला. घटना ओडिशातल्या सोनपूरची आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यातील आनंदाचे वातावरण एकदम दुःखात बदलून गेले.
मिळालेल्या माहितीनूसार, जुलांडा गावच्या मुरली साहूची मुलगी रोझी हिचे बालागीर जिल्ह्यातील रहिवासी बिसिकेशन याच्याशी लग्न झाले होते. परंतु लग्न झाल्यानंतर निरोप घेताना नववधूला अश्रू अनावर झालेच नाही. ती इतकी भावूक होऊन रडून लागली की ती बेशुद्ध पडली. वधूला शुद्धीवर आणण्यासाठी कुटुंबीयांनीही खूप प्रयत्न केले.
सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर तिला जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. जुलांडा गावातील एका व्यक्तीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी रोझीच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर ती खूप तणावात होती. तिच्या मामा आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून हे लग्न ठरवले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
- घायवळ,आंदेकर,मारणे पाठोपाठ आणखी एका कुख्यात गुंडाच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेडमध्ये हायवा घुसला, झोपलेल्या कामगारांना चिरडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
