Share

दिल्लीपुढे महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, संघर्ष करणं पवारांची खासियत; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांसोबतच बहिणींच्या घरावर आणि त्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल धाड टाकली. पुण्यातील बहिणीच्या घरी आयकर विभागाकडून अद्यापही चौकशी सुरू आहे. यासोबतच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याही मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे आज ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी ठाण्यात नवरात्री निमित्त देवीचा आरती केली.

ज्यांच्यावर धाडी टाकण्यात आल्या. ते नुसते दादांचे नातेवाईक नाहीत. आमचे देखील नातेवाईक आहेत. आमची जॉइंट फॅमिली आहे. आमचं एक कुटुंब आहे. संघर्ष करणे ही पवारांची खासियत आहे. दिल्लीने कितीही त्रास दिला. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्ली पुढे झुकणार नाही आणि झुकलाही नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नवरात्रौत्सवासाठी देवीच्या दर्शनासाठी ठाण्यात सुप्रिया सुळे आल्या होत्या. ‘नवरात्र म्हणजे माझी आई आहे. महाविकास आघाडीने मंदिरे उघडली.. त्यांचे आभार.. सरकारने जे नियम आखून दिलेला आहेत त्या नियमाचे पालन करावे’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!