Share

‘अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं’, प्रवीण दरेकरांचा टोला

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती पदी पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांपासून हे पद रिक्त होते. काल महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती.

या निवडीवर भाजपने आक्षेप घेतला असून कोर्टात देखील धाव घेतली आहे. अजित पवार यांनी यावर बोलताना,  “शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती पदी आल्या आणि आमचं सरकार आलं, म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त केलं” अशी प्रतिक्रिया देत भाजपला चिमटा काढल्याचे दिसून आले. यावर भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, “अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं?” अशी टीका करत शपथविधीनंतर निर्माण झालेली सल पुन्हा व्यक्त केली.

दरम्यान, विधानपरिषद उपसभापती निवडीवर आमचा आक्षेप कायम आहे, अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केली. सरकारची भूमिका हट्टाची आहे. गुरुवारी न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे, असे असतानाही ही निवडणूक घेण्यात आली, असे दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-

‘दाऊदने नाही तर नाही पण किमान अब्दुल खाटकाला तरी थोरातांना फोन करायला सांगा’

मराठी अस्मितेचा पुळका असणाऱ्या शिवसेनेला ‘हे’ पटत का?

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर अटक…

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!