Share

‘दाऊदने नाही तर नाही पण किमान अब्दुल खाटकाला तरी थोरातांना फोन करायला सांगा’

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला उडवून देण्याच्या धमकीनंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकी आल्याची माहिती समोर येत असून याबाबत गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी माहिती दिली आहे. हे फोन बाहेरच्या देशातून होते अस त्यांच म्हणणं आहे.

या धक्कादायक घडामोडीनंतर भाजप नेते अवधूत वाघ यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची खिल्ली उडवली आहे. ‘दाऊदने नाही तर नको पण कमीत कमी अब्दुल खाटकाला तरी सांगा की थोरातांना फोन करायला. कालपासून फोनच्या बाजुलाच बसलेत. घंटी पण वाजेना’. अस ट्विट करत अवधूत वाघ यांनी थोरातांना टोला लगावला आहे.

दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ” मुख्यमंत्र्यांना धमकी(शिवसेना), शरद पवार यांना धमकी (राष्ट्रवादी), अनिल देशमुख यांना धमकी (राष्ट्रवादी)..काँग्रेस ची परिस्थिती किती वाईट आहे;त्यांना बाकीच्या विषयात तर नाहीच पण या विषयातही भाव दिला जात नाही,” अशी उपरोधिक टीका केली आहे.

काय आहे हे ‘धमकी’ प्रकरण ?

कंगना रणौतवर गृहमंत्र्यांनी टिप्पणी केल्यानंतर हे असे फोन येत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरक्षा यंत्रणा करत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

काँग्रेसला ‘या’ विषयात देखील भाव दिला जात नाही ; भाजयुमोने उडवली खिल्ली

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर अटक…

अर्णव गोस्वामीनंतर आता कंगणावर आणला कॉंग्रेसने हक्कभंग प्रस्ताव, महाराष्ट्रात राजकीय गदारोळ

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!