मुंबई : भाजप नेते जयभगवान गोयल यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे :”आज के शिवाजी नरेंद्र मोदी” हे पुस्तक प्रकाशित केले आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय गदारोळ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाबरोबरही होऊ शकत नाही आणि ते करणंही योग्य नाही.
या प्रकरणानंतर शिवसेनेने यावरून भाजप आणि पुस्तकाचे लेखक गोयल यांना लक्ष्य केले,त्यांची त्यावेळी भूमिका योग्य होती. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज काही बोलत का नाही हा ही प्रश्न उपस्थित केले जात होते. मग भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण देताना शिवसेनेने आपल्या पक्षाचे नाव ठाकरेसेना ठेवावे शिवसेना नाही असं शिवसेनेला सुनावलं तर संजय राऊतांनी एका मुलाखतीत उदयनराजेंना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे असं आव्हानच दिले यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उदयनराजे भोसले यांच्यात मोठी खडाजंगी पहायला मिळाली होती.
पण जेव्हा शिवसेना भवनावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोबद्दलचा मुद्दा येतो तेव्हा शिवसेना काहीच बोलत नाही. मुंबईतील शिवसेना भवनावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे. मग शिवसेनेला हा छत्रपतींचा अपमान नाही का वाटत? जर शिवरायांवर त्यांचं प्रेम असतं तर त्यांनी अशा पद्धतीने फोटो खाली लाऊन छत्रपतींचा अपमान नसता केला.मुळात शिवसेनेने मराठी अस्मितेचा वापर आपल्या सोयीप्रमाणे नेहमी केला आहे.
मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने मागील 50 वर्षांच्या काळात किती मराठी माणसांचं कल्याण केलं? हा संशोधनाचा विषय आहे.आज मुंबईत मराठी माणसांची काय अवस्था आहे हे वेगळं सांगायला नको,परप्रांतीय मुंबईवर वेगवेगळ्या क्षेत्रात कब्जा करत असताना शिवसेनेनं यासाठी काय केलंय? त्यांना मराठी अस्मिता सांगण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? मराठी अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर शिवसेनेने आजपर्यंत स्वतःला वाचवण्यासाठी ढालीसारखा केला.
मराठी माणसाने नेहमी अस्मितेच्या प्रेमापोटी आजपर्यंत शिवसेनेला डोक्यावर घेतलं,पण आता ऐवढे वर्षे लोटल्यानंतर मराठी माणसाच्या हाती निराशाच लागलेली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेने अशा भावनिक मुद्द्यांवर व्यक्त होताना या अस्मितेच्या राजकारणाचा पुनर्विचार व्हायला हवा.
महत्वाच्या बातम्या:-
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर अटक…
फडणवीसांचा ढाण्या वाघ अडकला कोरोनाच्या विळख्यात
काँग्रेसला ‘या’ विषयात देखील भाव दिला जात नाही ; भाजयुमोने उडवली खिल्ली

