Share

Maharashtra Rain Update | राज्यात आज पश्चिम महाराष्ट्रासह ‘या’ भागात पावसाचा येलो अलर्ट

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या आठवड्यापासून पाऊस राज्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी असून आजही हवामान विभागाने राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात आज ‘या’ ठिकाणी येलो अलर्ट

गणपती संपले, नवरात्र आणि दसरा देखील संपला. तरी हा परतीचा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे. मुंबई पुण्यासह राज्यात अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळत आहे. पालघर, धुळे, कोल्हापूर, बीड,सोलापूर, सांगली, अहमदनगर, लातूर या भागांमध्ये देखील पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान खात्याकडून आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून करण्यात आलेला आहे.

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी सापडला संकटात

राज्यातील शेतकऱ्याचा सध्या पीक काढण्याचा हंगाम सुरू आहे. त्याचवेळी राज्यात सर्वत्र परतीचा पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या हातात तोंडाशी आलेल्या पिकासाठी चिंतेत आहे. शेतकऱ्याला परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि फळबागांचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. राज्यात आजही पावसाचा अंदाज दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात आज देण्यात आलेला आहे.

आज मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे,जळगाव,नाशिक आणि नगर या भागांत पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड लातूर आणि हिंगोली या परिसरांमध्ये देखील मध्यम ते हलक्या  शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!