Share

बळीराजाच्या चिंतेत वाढ, राज्याला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकीकडे हिवाळा संपून उन्हाळ्याचे वेध लागले असतानाच राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यात सगळ्यात वेदनादायक बाब म्हणजे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज आणि आजरा शहरात अवकाळी पावसानी जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा आंबा काजूच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पावसाने हजेरी लावलीय. ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. बनगरवाडी, वरकुटे-मलवडी भागात जोरदार पाऊस पडल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. तर म्हसवड, पुळकोटी, शिरताव, मार्डी, भाटकी भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

सांगली जिल्ह्यात आणि परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय. द्राक्ष आणि इतर पिकांना या अवकाळी पाऊसाचा फटका बसलाय. सांगली जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यासह राज्यातील बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.

2 लाखांपर्यंत मार्जमाफीच्या 2 याद्या प्रसिद्ध झाल्याने अडचणीतील शेतकऱ्याच्या जखमेवर सरकारने फुंकर मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आधीच्या अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे. अशात अज्जन एकदा राज्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!