🕒 1 min read
नागपूर: महाराष्ट्रात मुंबईपासून कोरोना (Corona) संक्रमणाला सुरुवात झाली होती. तसेच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने राज्यात निर्बंध देखील लागू करण्यात आले होते. आता परिस्थिती निवळत आहे आणि महाराष्ट्र अनलॉकच्या (Maharashtra Unlock) दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मुंबईनंतर राज्यभर कोरोनाचे संक्रमण वाढले. पण सर्वप्रथम मुंबईतच रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले. टप्याटप्याने राज्याच्या इतरही भागांत ही कार्यवाही करण्यात येणार आहेत, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले. या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पुर्णत: अनलॅाक होण्याची शक्यता असल्याचे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, कोरोनाचे निर्बंध शिथील होत असले तरीही मास्कमुक्ती मात्र होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे. नागपूरात मात्र आठवडाभरासाठी निर्बंध तसेच राहणार आहेत. महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने पण मास्कमुक्त (Mask Free) महाराष्ट्र होणार नाही, प्रक्येकांनी मास्क घालणं गरजेचं आहे. अनलॅाकिंग करताना चौथ्या लाटेचीही चिंता आहे. चौथी लाट ओमीक्रॅानपेक्षा जास्त वेगाने वाढत असल्याची माहिती आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- पुणे महानगरपालिकेत किरीट सोमय्यांचा सत्कार; भाजपचे शक्ति प्रदर्शन
- “अदानी-अंबानींची पूजा केली पाहिजे…” भाजपाचे ज्येष्ठ नेते के. जे. अल्फोंस
- टीम इंडियाचा क्रिकेटपटू ठरला राजकारणाचा बळी, माजी यष्टिरक्षकाचा आरोप
- न्यायालयाच्या निकालानंतर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
- “संजय राऊतला एवढी मस्ती, गुर्मी आहे की..”; सोमय्या आक्रमक


