Share

साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; महाराष्ट्राची मान शरमेने झुकली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली  होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,या महिलेवर 9 सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. चाकूहल्ला देखील करण्यात आला  होता यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे.

या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या प्रकरणी आरोपी मोहन चौहान (वय 45) याला घटनेनंतर अटक करण्यात आली आहे. साकीनाका पोलीस देखील या प्रकरणाचा प्रत्येक प्रकारे तपास करत आहेत. काल रात्री मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः साकीनाका पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटनेची चौकशी केली.पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात फक्त एक आरोपी समोर आला आहे. पोलीस संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत असले तरी पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!