Share

महाराष्ट्र शोकाकुल ; उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत, केली ‘हि’ विनंती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असतानाच सध्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी महापुराचे संकट ओढावलं आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला 60 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम असून संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्तानं कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाडमधील तळीये गावी जाऊन तेथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी तेथील नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. तसाच धीर चिपळूणवासियांना देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याकडून करण्यात आला आहे. चिपळूणची नेमकी परिस्थिती कशी होती हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट चिपळूणच्या बाजारपेठेतून पायी चालत परिस्थितीचा आढावा घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!