मुंबई : राज्यात काल 552 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5218 झाली आहे. विशेष म्हणजे काल दिवसभरात राज्यात 150 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. यासह राज्यभरात आतापर्यंत 722 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 4245 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
तर दुसरीकडे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
तसेच यबाबत ठाणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही आव्हाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे यूएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना नेमके कशासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले हे कळू शकलेले नाही, असे या वृत्तात म्हटले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी आव्हाड यांच्या सुरक्षेतील काही पोलिसांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

