Share

…म्हणून शरद पवार दौरा रद्द करून मुंबईकडे रवाना

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे आणि आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहोत. असे स्पष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकरी संवाद दौऱ्यावर निघाले होते. मात्र अचानक हा दौरा रद्द करून पुन्हा ते मुंबईकड रवाना झाले आहेत. कराड येथील कार्यक्रमानंतर पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले. भाजप-शिवसेनेत शिगेला पोहचलेला सत्तासंघर्ष आणि नवं सत्तास्थापनेसाठी काही तासच शिल्लक राहिले असताना पवारांनी राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईत परतण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सत्ता संघर्षावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. भाजपा-शिवसेना या दोघांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे. जनतेने काँग्रेस आघाडीला विरोधी बाकावर बसण्याची संधी दिली आहे. त्यामुळे ते काम राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थपणे पार पार पडू शकते. असे पवार या स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अवकाळी पावसाच्या संकटाबाबत पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली त्यानंतर ते चार दिवसांच्या शेतकरी संवाद दौऱ्यावर दौऱ्यावर निघाले होते.

अतिवृष्टीमुळे कोकणात मोठ्या प्रमाणात भातपिकांना नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार होते. कराड येथील कार्यक्रमानंतर ते कोकणातील दुष्काळ ग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांशी संव्वाद साधणार होते. मात्र, दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पुण्यात थोडावेळ थांबून ते आज रात्री उशिरापर्यंत मुंबईत परततील. अशातच पवार आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

शुक्रवारी (ता. ८) विधीमंडळाचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे सत्तेची कोंडी फोडण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल मिळालेल्या भाजपने सत्तास्थापनेचा दावा न केल्यास अनेक नवी समीकरणे जन्माला येण्याची शक्यता आहे. या स्थितीत आपली मुंबईतील उपस्थिती गरजेची आहे, हे ध्यानात घेऊन पवारांनी मुंबईत परतण्याचे ठरवले असावे, अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192423000898826240?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192447296266371072?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192451899217235968?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!