वर्धा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सेवाग्राम येथे बापू कुटी, बा कुटी, आणि चरखा विभागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बापू कुटीत प्रार्थनाही केली. राज्यपाल आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सेवाग्राम, गीताई मंदिर, मगन संग्रहालय, एम गिरी आणि पवनार येथे विनोबा आश्रमाला भेट दिली. पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी शासकीय विश्राम गृह येथे सूत माळ, चरखा आणि पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. येथे त्यांनी जिल्ह्याची कोरोना विषयक परिस्थिती बाबत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा केली.
सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी.एन.प्रभू यांनी सूत माळ, हिंद स्वराज, इंडिया ऑफ माय ड्रीम्स, महात्मा गांधी यांची आत्मकथा ही पुस्तके भेट दिली. खासदार रामदास तडस यांनी सुद्धा राज्यपालांचे सूत माळ देऊन स्वागत केले. राज्यपालांनी बापू कुटीची पाहणी केली. अध्यक्ष श्री.प्रभू यांनी आश्रमाची संपूर्ण माहिती दिली. तसेच त्यांनी येथील चरखा गृहात चालणारी सूत कताई, हातमाग, याबाबत माहिती जाणून घेतली आणि येथून 10 मीटर खादीचे कापडही खरेदी केले. गांधीजींच्या रसोडा मध्ये त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
यावेळी आश्रमाच्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचा अभिप्राय लिहिला. “येथे आल्यावर सादगी, शांती आणि स्वात्मनिर्भरतेचा आभास होतो. येथे अधिकाधिक युवाशक्ती पोहोचली तर स्वच्छता, स्वदेशी, स्वभाषा तथा आत्मनिर्भर भारत हे बापूंचे स्वप्न साकार होईल”, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या अभिप्रायातून व्यक्त केली
संजय राऊत तुमचे स्तुतीपाठक, हिंमत असेल तर इतर माध्यमांना मुलाखत द्या – चंद्रकांत पाटील
गीताई मंदिर येथे भेट देऊन त्यांनी विनोबा भावे यांनी कोरलेल्या शिळेवरील गीताई च्या अध्यायाची पाहणी केली. तसेच जमनालाल बजाज यांचे संग्रहालय आणि विनोबा भावे यांनी भूदान चळवळी वेळी भारतभर केलेल्या भ्रमणाची येथे दर्शविण्यात आलेली माहिती जाणून घेतली. मगन संग्रहालयात चालत असलेले ग्रामद्योगाची आणि तेथील संग्रहालय याची माहिती घेतली. त्यांनी खादी विक्री केंद्राला भेट देत खादीचे मार्केटिंग कसे करता याबाबत विचारणा सुद्धा केली.
एम गिरी येथील बापू आणि बा यांच्या प्रतिमेस सूतमाळा अर्पण करून एमगिरीने विकसित केलेले ग्रामोपयोगी तंत्रज्ञान समजून घेतले. याचा प्रसार गावापर्यंत करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. पवनार आश्रम येथे गौतम बजाज यांनी आश्रमाची माहिती आणि विनोबांचे तत्वज्ञानाबात त्यांना सांगितले. येथील भगिनींशी त्यांनी संवाद साधत राम मंदिराची आणि येथे उत्खननात सापडलेल्या मूर्तीची पाहणी केली. यावेळी आमदार पंकज भोयर,आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, नगराध्यक्ष अतुल तराळे सरपंच सुजाता ताकसांडे, व्यंकट राव, विभा गुप्ता उपस्थित होत्या.
शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्यानंतर राष्ट्रवादीतील नाराजीवर पालकमंत्री भरणेंची लक्षवेधी प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

