Share

संजय राऊत तुमचे स्तुतीपाठक, हिंमत असेल तर इतर माध्यमांना मुलाखत द्या – चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली गेली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये दिली आहेत. अगदी लॉकडाउनच्या कालावधीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भातही मुख्यंत्र्यांनी आपली रोकठोक मते मांडली आहेत. तर दुरीकडे विरोधीपक्षावर देखील मुख्यमंत्र्यांनी शरसंधान साधलं आहे.

भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच राज्यातील सरकार पाडण्याची गरज नाही ते अंतर्विरोधाने पडेल, असे भाकीत केले होते. यासंदर्भात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. दिल्लीत जाऊन एक घोषणा मात्र त्यांनी नक्की केली, ती म्हणजे हे सरकार पाडण्याचा आपला इरादा नाही. हे त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये येऊन सांगितले. हे किती दालासादायक आहे तुम्हाला? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यावर "मी तर इथे बसलेलोच आहे. त्यांचा इरादा असेल, नसेल…काही जण सांगतात की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार. माझं म्हणणं, वाट कसली बघताय आता पाडा. माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा. मी काय फेविकॉल लावून बसलेलो नाहीय. पाडायंच तर पाडा, जरूर पाडा", अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला सुनावले.

शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्यानंतर राष्ट्रवादीतील नाराजीवर पालकमंत्री भरणेंची लक्षवेधी प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन दाखवा’ असा पलटवार केला आहे. तसेच, राज्यात दोन मुख्यमंत्री आहे, असा टोलाही त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला. चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरही सडकून टीका केली. ‘चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहेत. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी’, असे थेट आव्हानच पाटील यांनी दिले.

दिलासादायक : राज्यभरात एकाच दिवसात कोरोनाचे ६ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!