Share

शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्यानंतर राष्ट्रवादीतील नाराजीवर पालकमंत्री भरणेंची लक्षवेधी प्रतिक्रिया

Published On: 

सोलापूर : पक्षाध्यक्ष शरद पवार आणि सोलापूर हे नाते जिव्हाळ्याचे आहे. सोलापूरचे आपण काही तरी देणे लागत असल्याने पवार यांनी सोलापुरातील कोरोना स्थितीची आढावा बैठक घेतली. या दौऱ्यात फक्त लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी यांनाच बोलविण्यात आले होते. इतर कोणालाही या दौऱ्यात आपण भेटणार नसल्याचे पक्षाध्यक्ष पवार यांनी सांगितले होते. त्यानुसारच आपण मोजक्या व्यक्तींना निरोप दिल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. सोलापुरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोरोनाचा संकट दूर झाल्यानंतर या सर्व नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांचा गैरसमज आपण दूर करणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी सांगितल आहे

सध्या कोरोनाचे संकट महत्त्वाचे आहे. हे संकट अगोदर संपवू त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीतील नाराज मंडळींचा गैरसमज दूर करू असा विश्वास पालकमंत्री भरणे यांनी आज व्यक्त केला. कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दिलासादायक : राज्यभरात एकाच दिवसात कोरोनाचे ६ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी

दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार आहे. राज्यातील सरकारप्रमाणेच जिल्ह्यात काम करतानाही आम्ही एकत्रित मिळून काम करत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मी सर्वांचे फोन घेतो, बैठकीत असल्यावर कसा फोन घेणार?, बैठक संपल्यानंतर मी त्या व्यक्तींना परत फोन करत असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.

भाजपला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!