Share

महाराष्ट्र सरकार कुणाला घाबरत नाही, ‘ते’ बिहार निवडणुकांसाठी राजकारण करत आहेत: रोहित पवार

Published On: 

🕒 1 min read

पुणे: सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी गुंतागुंत वाढत असून मुंबई पोलीस व बिहार पोलीस यांच्यात देखील तपासावरून तणाव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यातच, हे प्रकरण आता राजकीय रंग घेताना दिसून येत आहे. नेत्यांकडून होणारी सीबीआयची मागणी, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दबावाखाली असल्याचे केलेले वक्तव्य या सर्वांवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवार यांनी, “महाराष्ट्रात असलेलं कोणत्याही पक्षाचं सरकार कुणालाही घाबरत नाही हे आधी सर्वांनी लक्षात घ्यावं. शासकीय व्यक्ती महाराष्ट्रात येते. त्या ठिकाणी शासन-शासन यामध्ये पाळावयाचा प्रोटोकॉल पाळला जावा असं वाटतं. मात्र, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या खोलात जावंच लागेल. मुंबई पोलीस सक्षम आहेत. ते नक्कीच या प्रकरणाचा छडा लावतील.” असे सांगितले आहे.

शाह यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते अडकले कोरोनाच्या विळख्यात;येडियुरप्पा यांनाही कोरोनाची झाली लागण 

दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहेत. तसेच, या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधल्या माफियांच्या दबावाखाली आहेत, असा गंभीर आरोप सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणात जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यासाठी कल दिला जातो आहे, असे म्हणत काँग्रेस बिहारमधील जनतेला काय तोंड दाखवणार? असा सवाल सुशीलकुमार मोदी यांनी उपस्थित केला आहे.

“शरद पवारांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे”

त्यावर आता उत्तर म्हणून रोहित पवार यांनी, ‘महाराष्ट्र सरकार हे कुणालाही घाबरत नसून बिहारच्या निवणुकांची पार्श्वभुमी बघता हे आरोप करून राजकारण केलं जात आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट देखील शेअर केली होती.

रोहित पवार यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट-

बिहारमधील एका सामान्य कुटुंबातील एक तरुण मुंबईत येतो काय… पाहता पाहता चंदेरी दुनियेत यशाच्या शिखरावर पोचतो काय आणि एक दिवस अचानक दृष्ट लागावी तसं वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षीच तो आत्महत्या करतो काय… अभिनेता सुशांत सिंहच्या बाबतीत घडलेली ही घटना सर्वांनाच चक्रावणारी व मनाला चुटपूट लावणारी आहे. या घटनेला आता दीड महिना झालाय. सुरवातीला मुंबई पोलिस आणि चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित असलेलं हे प्रकरण आता हळूहळू राजकीय रंग घेतंय की काय अशी शंका येऊ लागलीय.

‘मुंबई पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं’; संजय निरुपम यांची घणाघाती टीका

सुशांत गुणी अभिनेता होता का? तर निश्चितच होता. त्याची आत्महत्या आपल्या सर्वांसाठीच क्लेशदायक आहे. त्यामुळं या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा. गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचं नावं घेतलं जातं त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही. या घटनेत चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी आतापर्यंत चौकशीही केलीय. त्यामुळं मुंबई पोलीस हे सक्षम असून त्यांच्याकडून योग्य तपास होऊन याप्रकरणी न्याय मिळेल, असा विश्वास आहे.

पण दरम्यानच्या काळात सुशांत सिंहच्या वडलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिहारमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि लगोलग बिहार पोलीस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबईतही दाखल झाले. वास्तविक, बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहित नव्हतं. तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा टिव्हीवरुन ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असं वाटलं नव्हतं. की केवळ याच घटनेपुरती त्यांनी तत्परता दाखवली, हे माहीत नाही. पण असो. खरंच ते इतके कर्तव्यदक्ष असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं आणि यामुळं बिहारमधील गुन्हेगारीचं प्रमाणही कमी होईल, अशी अशी अपेक्षा करायलाही हरकत नाही. मात्र एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आत्महत्येचं कुणी राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे.

बिहारमध्ये तोंडावर आलेल्या निवडणुका पाहिल्या तर या घटनेचा कुणीही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग करून घेता कामा नये आणि असं कुणी करत असेल तर तो प्रयत्न आपण सर्वांनीच हाणून पाडायला हवा.

सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे, पण आज कोरोनाच्या संकटाचा काळ आहे. हातावर पोट असलेले, छोटे-मोठे उद्योजक, कामगार यांच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ आलीय. काहींनी आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्यात. सिनेसृष्टीचा विचार केला तर स्पॉटबॉयपासून पडद्यामागचे कलाकार, सहकलाकार व पूरक व्यावसायिक असे अनेकजण आज आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांच्यातील काहींनी आत्महत्याही केली असेल. दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई, कर्जबाजारीपणा यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायेत.

अचानक केलेल्या लोकडाऊनमुळे सुरवातीच्या काळात अनेक मजुरांना आपला जीव गमवावा लागला. काहीजण तर चालत्या रेल्वेतूनच अनंताच्या प्रवासाला निघून गेले. कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्यामुळे जिवंतपणीच मरणयातना सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आलीय.यावर कुणीच काही का बोलत नाही?की ते आपल्या समाजाचा भाग नाही?की ती हाडा-मांसाची माणसं नाहीत?की ते सेलिब्रिटी नसून गरीब असल्याने आपण बोलत नाहीत? की आपल्या संवेदना बोथट झाल्या?की आपल्याला काही दिसतंच नाही?आपला देश म्हणजे कायद्याचं राज्य आहे. असं असेल तर तिथं सर्वांना समान न्याय हा मिळालाच पाहिजे.

म्हणूनच सुशांतच्या अकाली जाण्याचा निःपक्षपाती तपास झालाच पाहिजे आणि कोरोनाच्या संकटामुळे कुणावर आत्महत्येची वेळ येणार नाही याचीही दक्षता आपण घ्यायला पाहिजे. याबाबत देशातील सर्व राज्य सरकारे व केंद्र सरकार यांनी भेदभाव, राजकारण, हेवेदावे हे विसरुन एकत्रित काम करायलाच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!