🕒 1 min read
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात ‘दादा’ म्हणून ओळखले जातात. शरद पवारांच्या तालमीत घडलेले, समृद्ध राजकारणाचा वारसा, रोखठोक बोलणारे आणि कर्तृत्ववान म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आज रक्षाबंधन दिनी अजित दादांच्या बहिणीने, ‘अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री झालेलं पाहायची,’ ईच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, भाजपाची साथ सोडत शिवसेना महायुतीमधून बाहेर पडली व राष्ट्रवादी-काँग्रेसच्यासोबत सत्तेचं गणित ऐनवेळी बदलत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यावेळी अजित पवार हे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकदिवस पंतप्रधानपदी बघायचे आहे. तसेच, अजितदादांना सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. आमच्या सर्वांच्या मनातील इच्छा एक दिवस पूर्ण व्हावी,” अशी आशा आहे, असे डॉ. रजनी इंदुलकर यांनी म्हटले आहे.
‘मुंबई पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं’; संजय निरुपम यांची घणाघाती टीका
याचबरोबर, बहीण म्हणून अजित पवार यांनी आपले काही दु:ख असेल तर हलके करण्याची आम्हाला संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यांनी लोकमत या वृत्तसंस्थेशी बातचीत करताना हि ईच्छा व्यक्त केली. तसेच यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना देखील मोकळ्या केल्या. त्या म्हणल्या, “दादा तुम्ही सगळ्यांसाठी, फक्त आमच्यासाठी नाही, तर समस्त कार्यकर्त्यांसाठी, न ओळखीच्या माणसांसाठी, लाखो-लाखो महाराष्ट्रातच्या लोकांसाठी कामे केली आहेत. सतत तुम्ही त्यांना काही तरी देत आला आहात.”
‘रक्षाबंधनाचा सण समाजातील समस्त माता-भगिनींबद्दलचा मान-सन्मान, आदर वाढवणारा असेल’
यासोबतच त्यांनी अजित दादांना भावनिक आवाहन देखील केलं आहे. “कधीतरी आपल्या मनात काय आहे, काय चाललंय किंवा आपलं दु:ख काय आहे, ते कधीतरी शेअर करा. तुमचेही काही टेन्शन असतील ते वाटायला आवडेल. पण, तुम्ही हे आतापर्यंत केले नाही. नेहमी एक चांगला हसरा चेहरा घेऊन आमच्यासमोर आला आहात, तर हीच आमची इच्छा आहे की, आम्हा बहिणींना तुमची दुख:ही काही असतील छोटी-मोठी ती हलकी करायची आम्हाला संधी मिळाली तर बरं होईल.”
भाजपचा ‘हा’ झुंजार नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
