Share

बाजारातील मास्कच्या तुटवड्यावर राज्य सरकारचा नवीन उपाय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्यभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडल्यापासून नागरिकांमध्ये काहीशी घबराट पसरली आहे.  सरकारी यंत्रणांकडून मास्क वापरणे जरुरीचे नाही असा स्पष्ट केलं असलं तरी नागरिकांनी मात्र खबरदारी आणि काळजी म्हणून मास्क खरेदी सुरूच ठेवली आहे.

या अधिकच्या मागणीमुळे बाजारात मास्कचा तुटवडा आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने कारागृहातील बंद्यांच्या माध्यमातून मास्क तयार करण्यास सुरुवात केली आहे. या बाबतची माहिती शासनाचा माहिती आणि जनसंपर्क महासंचालानालायाकडून देण्यात आली आहे.

‘कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमधील बंद्यांद्वारे मास्क निर्मिती सुरू.’ अशी माहिती राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचानालायाने दिली आहे.

या आधी केरळ सरकारनेही राज्यातील कारागृहातील बंद्यांकडून मास्क तयार करून घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!