Share

सत्ता संघर्ष : आजचा दिवस निर्णायक, तर कॉंग्रेस नेते उद्या सोनिया गांधींच्या भेटीला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 14 दिवस झाले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवेसेना – भाजप हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी अजूनही बसलेले नाही. तर दुसरीकडे कॉंग्रेस आघडीच्या नेत्यांनीही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तसेच एकीकडे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगत असतानाच उद्या काँग्रेस नेते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. उद्या संध्याकाळी काँग्रेसचे नेते दिल्लीला जाणार आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे 90 टक्के आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूनं आहेत, अशी माहिती मिळते आहे.

काँग्रेसल मधला एक गट असा आहे की जो शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. तर विरोधीपक्षनेते विजय वड्डेटीवर यांच्या मते, 90 टक्के काँग्रेसच्या आमदारांचं असं म्हणण आहे की, भाजपला आता थांबवलचं पाहिजे आणि म्हणून शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. हीच भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचे नेते उद्या दिल्लीत हायकंमांडची भेट घेणार आहे.

दरम्यान राज्यात आज सत्ता स्थापनेच्या दृष्टीने काही निर्णायक घडामोडी घडणार आहेत. आज भाजपचे वरिष्ठ नेते राजभवनावर राज्यपालांच्या भेटील जाणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे १४ दिवसाच्या सत्ता संघर्षानंतर आज काही ठोस निर्णय होणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192316747753218049?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192300947470348289?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!