🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवरून कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री कारवाई करणार का? की नेहमीप्रमाणे क्लीनचीट देणार? असा सवाल कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसच्या maharashtra congress या आॅफिशियल ट्विटर अकाउंट वरून हा सवाल करण्यात आला.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे काम सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, टीका-टिप्पणी सुरु आहे. याचदरम्यान राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवरून कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले, अशी टीका कॉंग्रेसने केली.
इतकेच नव्हे तर, खुद्द जलसंधारण मंत्र्यांनी सभागृहात याची कबुली दिली क़ाहे. आतातरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर कारवाई करणार का? असा सवाल कॉंग्रेसने केला. याचबरोबर का नेहमीप्रमाणे क्लीनचीट देण्याचे सत्र पुन्हा एकदा सुरू होणार?, असा टोलाही कॉंग्रेसने लगावला.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे.
जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले!
खुद्द जलसंधारण मंत्र्यांनी सभागृहात याची कबुली दिली. आतातरी मुख्यमंत्री कारवाई करणार का? की नेहमीप्रमाणे क्लीनचीट देण्याचे सत्र पुन्हा एकदा सुरू होणार? pic.twitter.com/CcCQTtemqW— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 24, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
