Share

आता कसं होणार ! विधान परिषदेत कॉंग्रेसची 2 जागांसाठी मागणी, महाविकास आघाडीत नवा पेच

Published On: 

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत नवीन पेच निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने विधान परिषदेसाठी आम्हाला दोन जागा हव्या असल्याचा हट्ट लावून धरला आहे. येत्या 21 तारखेला विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना- राष्ट्रवादी प्रत्येकी 2 तर कॉंग्रेससाठी 1 जागा असे समीकरण ठरले होते. मात्र आता कॉंग्रेस 2 जागांची मागणी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्याचे काम सुरू केल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीत विधान परिषद सहावा उमेदवार द्यावा यासाठी काँग्रेस आग्रही आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंगळवारी रात्री बैठक झाली. परंतु, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसकडून जास्तीची जागा लढायची की नाही, याबाबत तोडगा अजून निघालेला नाही.

विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडे मतांचा आकडा नसतानाही एक जागा जास्त लढवत आहे, हा मुद्दा काँग्रेसनं बैठकीत उपस्थितीत केला. त्यामुळे दोन जागा लढवण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती समोर आली. काँग्रेसचे राज्यातील नेते राज्यात दोन जागांवर लढावे, यासाठी दिल्ली हायकमांडकडे आग्रह करून आहे.

काँग्रेस पक्षाची आग्रहाच्या मागणीवर तोडगा काढण्याची जबाबदारी आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर येऊन ठेपली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवारांची जास्तीची मतं वळवत दुसरा उमेदवार निवडणूक येण्यासाठी सहकार्य करावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.

दरम्यान काँग्रेस पक्षाने दुसरा उमेदवार दिला तर महाविकास आघाडीचे सहावा उमेदवार राहील, दुसरीकडे भाजपने चार उमेदवार दिले तर 9 जागासांठी 10 उमेदवार राहिल्यावर विधान परिषद बिनविरोध होणे कठीण होऊन जाईल. विधान परिषद बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना जास्त आग्रही आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!