Share

पक्षविरोधी कारवाई केल्याने राष्ट्रवादीने धाडली ‘त्या’ आमदाराला नोटीस

Published On: 

अहमदाबाद : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत गुजरात मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकमेव आमदार कंधाल जडेजा यांने पक्षाचा व्हीप डावलून मतदान केल्याने त्यांना पक्षाने ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे. गेल्या 19 जून रोजी झालेल्या निवडणुकीत पक्षाने त्यांना कॉंग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप जारी केला होता. पण त्यांनी तो डावलून भाजप उमेदवाराला मतदान केल्याचे निदर्शनाला आल्याने त्यांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांना सात दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात आले असून त्यांनी तो खुलासा केला नाही तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

जडेजा यांनी आपण भाजप उमेदवारांना मतदान करणार आहोत, अशी जाहीर भूमिका मांडली होती. या आधीही त्यांनी सन 2017 च्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही पक्षाचा व्हीप डावलून कॉंग्रेसऐवजी भाजपला मतदान केले होते. गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत चारपैकी तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर कॉंग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

‘तुकाराम मुंडेंवर आरोप करायला महापौरांना लाज वाटली पाहिजे’

दरम्यान, या निवडणुकीत कॉंग्रेसचेही आठ आमदार फुटले त्यामुळे कॉंग्रेसचे गणित बिघडले अन्यथा कॉंग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणणे सहज शक्य होते.

रामदेव बाबांच्या पतंजलीने कोरोनावर औषध आणलं, आज ठेवणार जगासमोर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!