Share

शेतात विद्युत पुरवठा करणारे पोल पडल्याने गैरसोय, बळीराजावर आंदोलनाची वेळ

Published On: 

सेनगाव – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जे लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते त्यामुळे शेतकरी आधीच डबघाईस आला असताना त्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यामुळे शेतात विद्युत पुरवठा करणारे 30 ते 40 पोल पडल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतात हळद लागवडी साठी, कपाशीला पाणी देण्यासाठी आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. पावसाचा तडाखा एवढा जोरदार होता की सेनगाव तालुक्यात शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. यामुळे जिल्ह्यातील बहूतांश गावात वीजपुरवठा खंडित झाला होता. पडलेल्या विद्युत पोलचा पंचमनामा न झाल्याने सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारातील शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर काळ्या फिती लावून महावितरण विरोधात सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे.

एबीपी माझा ने दिलेल्या वृतानुसार,विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पळत मोजक्याच शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आंदोलक चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

दरम्यान, एका बाजूला शेतकरी आपले प्रश्न घेऊन आंदोलन करत आहेत तर दुसऱ्या बाजूला राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात देखील सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. काल 1 जून रोजी कोरोनाच्या 2361 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 70013 वर गेली आहे. यापैकी सध्या राज्यात 37 हजार 234 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

दरम्यान, सोमवारी राज्यात 76 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2362 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 779 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत 30108 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पुणे : ६ महिन्यांपासून पगार रखडला ; हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन,रुग्णांचे होत आहेत हाल

पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय, कोरोनाबाधित पोलिसांसाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करणार

धक्कादायक ! पुण्यात कोरोनाने डॉक्टरांनाचं गिळले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!