Share

महादेव जानकरांना मागितली ५० कोटींची खंडणी, ५ आरोपी अटकेत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : रासपचे नेते आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना पुणे पोलिसांनी बारामतीतून अटक केली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात एकाच खळबळ उडाली असून जानकरांना नेमक्या कोणत्या कारणामुळे ब्लॅकमेल करण्यात आलं आहे, याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.

महादेव जानकर आणि शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतोले यांची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी ५० कोटींची खंडणी मागत होते. रक्कम देण्यास तयार आहोत, असं सांगून पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. १५ कोटींची रक्कम मागण्यात आली होती. पण प्रत्यक्ष साडे चार लाख रुपये जमा केले आणि खाली कागदाचे बंडल भरले आणि सापळा रचला. यानंतर पोलिसांनी इंद्रकुमार भिसे, सचिन पडळकर, दत्ता करे, तात्या कारंडे, विकास अलदर या पाच ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे अटक केलेले सर्व आरोपी याअगोदर रासपचेच कार्यकर्ते होते.

या प्रकरणाची तक्रार बाळासाहेब रूपनवर यांनी पोलिसात केली आहे यावेळी रुपनवर यांच्या माहितीनुसार, “सचिन पडळकर याने जानकरांना फोन करुन एक कोटी रुपये मागितले. निवडणूक लढण्यासाठी पैसे हवे असल्याचं त्याने सांगितलं. शिवाय बदनामीची धमकीही दिली. आम्ही एवढे पैसे देऊ शकत नाही, असं जानकरांनी स्पष्ट केलं. पण फोनवरुन त्रास सुरुच होता. जानकरांनंतर दोडतोले यांना फोनवरुन त्रास सुरु करण्यात आला”.

“आरोपींनी दोडतोले यांच्याकडे मागणी केली की, तुमच्या महामंडळासाठी एक हजार कोटी रुपये आले आहेत, त्यातून १०० कोटी रुपये द्या. मग मला फोन आला आणि बारामतीला बैठकीसाठी बोलावलं. तुमचा निरोप जानकर साहेब आणि दोडतोले यांना कळवतो असं त्या बैठकीत सांगितलं. आरोपींनी ५० कोटींची मागणी केली होती. काही दिवसांनंतर पुन्हा फोनवरुन त्रास सुरु झाला आणि पुण्यात बैठकीला बोलावलं. ५० ऐवजी ३० कोटी रुपये द्या अशी मागणी केली आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. अगोदर १५ कोटी रुपये देण्याचं ठरलं होतं.

सापळा रचण्यासाठी साडे चार कोटी रुपये जमा केले आणि खाली कागदी बंडल होते. पैसे देण्यासाठी बारामतीतील हॉटेलमध्ये भेट ठरली. पण सगळे पैसे मोजेपर्यंत जाऊ नका, असं आरोपींनी सांगितलं. तेवढ्यात पोलिसांनी सर्वांना अटक केली,” अशी माहिती बाळासाहेब रुपनवर यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!