🕒 1 min read
चेन्नई: कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटत आहेत. याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने एक आदेश जारी करत शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. तसेच पुढील निर्णय येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालायत धार्मिक पोशाख करून येण्यास विद्यार्थ्यांना बंदी घातली आहे. या निर्णयाला आवाहन देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात कॉँग्रेसच्या नेत्याकडून केली गेली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
आता मद्रास उच्च न्यायालयाने या प्रश्नावर भाष्य केले आहे. हिंदूंच्या मंदिरात हिंदूशिवाय आणखी कोणालाही प्रवेश न करू देण्याची मागणी करणारी एक याचिका न्यायासाठी आली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे. ‘जास्त महत्वाचे काय आहे? देश की धर्म ?’ असा सवाल याचिकाकर्त्यांना केला. हिजाब बंदी च्या वादावरुन सुरू असलेल्या याचिकेवर ही टिपणी महत्वपूर्ण मनाली जाते.
न्यायमूर्ती मुनीश्वरनाथ भंडारी आणि न्यायमूर्ती डी. भारती चक्रवर्ती यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. महत्वाचं काय आहे ? देश की धर्म ? कोणी हिजाबच्या मागे जातोय तर कोणी धोतराच्या मागे! हे धक्कादायक आहे. असे न्यायालयाने यावेळी सांगितले. हा एक देश आहे की, धर्म किंवा कोणत्या इतर गोष्टीवर आधारलेला प्रदेश आहे ? असे नमूद करत हिजाब आणि धोतर या दोनही गोष्टींवर भाष्य केले.
महत्वाच्या बातम्या:
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद रत्नागिरी दौऱ्यावर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावाला देणार भेट
- ट्वीटरवर होत आहे रामदास आठवलेंच्या ‘या’ फोटोची चर्चा
- रविना टंडनच्या वडिलांचे निधन
- PUSHPA FEVER! ‘श्रीवल्ली’ गाण्याचे इंग्लिश व्हर्जन व्हायरल
- “तू प्लेयर चांगला होता पण..” बायकोचा हिजाबमधील फोटो टाकल्याने इरफान पठाणवर टीकेचा भडीमार


