Share

“तू प्लेयर चांगला होता पण..” बायकोचा हिजाबमधील फोटो टाकल्याने इरफान पठाणवर टीकेचा भडीमार

Published On: 

मुंबई: भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याचा मुलगा आणि पत्नी सफा बेग दिसत आहेत. विमानतळावर काढलेला हा फोटो आहे. यात सफाने हिजाब घातला असून याच कारणावरून लोकांनी इरफान पठाणला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

फोटोला इरफान पठाणने कॅप्शनमध्ये लिहले कि त्यांच्या मुलाचा हा पहिला हवाई प्रवास होता. मात्र सोशल मीडियावर बुरखा किंवा हिजाबमध्ये सफाचे फोटो पोस्ट न केल्याने काही वापरकर्त्यांनी इरफानला ट्रोल केले आहे. कर्नाटकातील एका शाळेत हिजाब घालण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याने हा फोटो शेअर केल्याचे आरोप करण्यात आला आहे. एका युजरने लिहले ” तू खूप चांगला खेळाडू होतास, पण एक माणूस म्हणून तुझी विचारसरणी खूप रूढिवादी आहे.”

https://www.instagram.com/p/CZyu6d_PQQo/?utm_medium=copy_link

 

इरफान पठाणने काही दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये त्याने मुलाला खांद्यावर बसवले असून पत्नी सफा त्याच्यासोबत उभी आहे. फोटो पाहताना समजते की, फोटो एडिट करताना सफाने मुखवटा घातला आहे. इरफानची पत्नी नेहमी तोंडावर मास्क घातलेली किंवा हिजाब घातलेली दिसते. तिने आतापर्यंत चेहरा दाखवलेला नाही. याबाबत ट्रोल झाल्यानंतर तिने बुरखा घालण्याचा स्वतःचा निर्णय असल्याचे सांगिलते होते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!