Share

शरद पवारांना अजून एक धक्का, राष्ट्रवादीचा ‘हा’ संस्थापक सदस्य करणार भाजपमध्ये प्रवेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच इतरही अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयची घोषणा त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली. यावेळी बोलताना आतापर्यंत तुम्ही साथ दिली.

प्रेम दिलं म्हणून काम करू शकलो. माझ्यावर अनेकदा व्यक्तिगत टीकाही झाली. आजपर्यंत सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतलाय अस मधुकर पिचड म्हणाले.

पुढे बोलताना, त्यांनी ‘देश बदलला आहे. आदरणीय मोदींमुळे विकासाची चर्चा होतेय. परिवर्तनाच्या बाजूनं पाऊल पडत असताना आपण ही त्याच बाजूनं जावं हा निर्णय घेतला.

शरद पवारांची आजपर्यंत मला साथ दिल्यानंतर अनेक काम झाली. त्यांना मी विसरू शकत नाही. मला आता काही मिळवायचं नाही मात्र जे चांगलं आहे त्या बाजून राहायचं असा विचार केलाय. स्थानिक भाजप नेत्यांनीही आम्हाला साथ देण्याचं आश्वासन दिलं आहे, ही भावना मधुकर पिचड यांनी बोलून दाखविली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!