टीम महाराष्ट्र देशा : शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला चांगलच फैलावर घेत खास ठाकरे शैलीत तुफान फटकेबाजी केली. यावर भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली असून भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पलटवार केला आहे.
राज ठाकरे यांनी केलेलं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त माणसाची बेताल बडबड आहे, असा पलटवार त्यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
@RajThackeray यांनी केलेले कालचे भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त माणसाची बेताल बडबड आहे
— Madhav Bhandari (@Madhavbhandari_) March 10, 2019
शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचा 13 वा वर्धापन दिन होता. यानिमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीकाही केली. निवडणुकीच्या मध्यात पुन्हा पुलवामा सारखा असाच एक हल्ला घडवला जाईल, असा गंभीर आरोप राज यांनी यावेळी केला होता. तर ट्रोल करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी ‘लावारिस’ असे संबोधत शिव्या देणाऱ्यांना घराबाहेर काढून ठोका असे आदेशच आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

