Share

नाद खुळा : ‘या’ पठ्ठ्याने चक्क चांदीचा मास्क बनवून घेतला

Published On: 

रत्नागिरी – राज्यात रविवारी कोरोनाच्या 3390 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सध्या राज्यात 53 हजार 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज 1632 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 978 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर एकाच दिवशी 120 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा मृतांचा आकडा 3950 वर पोहोचला आहे.

कोरोना विषाणूचा प्रकोप वाढू लागताच खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्यास सांगण्यात येत आहे. पण रत्नागिरीतील एकाने चक्क चांदीपासून मास्क बनवून घेतला आहे. या मास्कची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

रत्नागिरीतील मांडवी येथे रहिवासी शेखर यशवंत सुर्वे यांनी खास कोल्हापूर येथून हा चांदीचा मास्क तयार करून मागविला आहे. या बाबत माहिती देताना शेखर सुर्वे यांनी सांगितले की, एक आवड म्हणून हा मास्क घेतला आहे. याचे वजन 60 असून त्याची किंमत 3900 रुपये आहे.

मी मोबाईलवर चांदीच्या मास्कचा एक फोटो बघितला होता आणि अगदी तसाच मास्क मला हवा होता. म्हणून सोनार हंसराज ज्वेलर्स यांना तो फोटो दाखवला आणि त्यांनी सेम तसाच मास्क कोल्हापूरहून मागवून घेतला. 15 दिवसापूर्वी कोल्हापूरवरून खास माणूस तो घेऊन आला. केवळ एक हौस म्हणून आपण तो घेतल्याचे सुर्वे यांनी सांगितले.

राज्यभरात ‘फिव्हर क्लिनिक्स’ सुरु करणार – उद्धव ठाकरे

औरंगाबादमध्ये आता होम कॉरंन्टाईन राहता येणार नाही

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ ; नव्याने ३२५४ रुग्णांची नोंद

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!