मुंबई : जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा. दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा. मास्क हे छत्रीसारखे वापरु नका. ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा. मास्क अत्यंत दक्षतेने वापरा, एकाचा मास्क दुसऱ्याने वापरु नका असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधलाना आवाहन केले आहे.
तसेच, राज्यभरात फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत. राज्याच्या प्रत्येक विभागात ही क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत. त्यामुळे चार प्रकारामध्ये ही फिव्हर क्लिनिक्स असतील, त्यामध्ये डॉक्टर्स असतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. विलगीकरण, अलगीकरण हे जसं आहे तसं हे वेगळीकरण आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
सध्या राज्यात जे टीमवर्क आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. आपण सगळेजण एकसंध कसे राहात आहोत हे पाहिलं जातं आहे. आपल्याकडे रुग्णांची वाढ होते आहे ही बाब चिंतेची आहे. कोरोना आपल्या मागे लागला आहे. मात्र कोरोनाच्या मागे आपण हात धुवून लागलो आहोत. घरी बसून सगळ्यांना कंटाळा आला आहे. पण सध्या आपल्याकडे काहीही इलाज नाही. घरात राहूनही आपली जनता तणावमुक्त कशी राहिल हे वृत्तवाहिन्यांनी पहावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

