औरंगाबाद : सोलापूर धुळे महामार्गावरील औट्रम घाटातील बोगदा हा दक्षिण व मध्य भारताला जोड़नारा महत्वाचा दुवा असल्याने या बोगद्याचे काम झाल्यास मराठवाड्यासाठी दळनवळनाला मोठी चालना मिळून वरदान ठरेल असे मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी दरम्यान व्यक्त केले.
सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय दिल्ल्ली येथील मुख्य अभियंता यु.जे.चामरगोरे यांनी औट्रम घाटातील बोगद्याची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खैरे यांनी घाटाची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून आलेले मुख्य अभियंते चामरगोरे यांना औट्रम घाटातील बोगदा हा मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे याची माहिती करून दिली.
औट्रम घाटातील नियोजीत बोगदयाची सुरुवात अन्धानेर फाटयापासून होणार असून चाळीसगांव तालुक्यातील घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बोढरे गावाजवळ संपणार आहे यावेळी मुख्य अभियंता चामरगोरे यांनी सांगितले की, या बोगद्याचा डीपीआर मंजूर असून बोगद्यातून महामार्गासोबत रेल्वे मार्गाला सुद्धा रेल्वेने मंत्रालयाने होकार कळविला आहे परंतू शासनकडुन अद्याप निधी न झाल्याने हे काम प्रलंबित आहे.
यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येईल. गेल्या पंधरा वर्षापासून चंद्रकांत खैरे औट्रम घाटातील बोगदा व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. यावेळी महामार्ग संघर्ष समितीचे डॉ अण्णा शिंदे, सरपंच अशोक दाबके, उपतालुकाप्रमुख तथा सरपंच राजू राठोड, माजी नगराध्यक्ष डॉ सदाशिव पाटील, सरपंच साहेबराव राठोड,उपसरपंच कैलास जाखड़, प्रकाश काचोळे आदिसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईट सुरुवातीनंतरही भारतीय संघ कसा उभारतोय मोठी धावसंख्या
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं

