जालना : जालना शहरातील नूतन वसाहत भागातील नागरी शहरी आरोग्य केंद्र हरवल्याची तक्रार जनता आणि पोलीस समन्वय समितीने जालना पोलिस ठाण्यात दिली आहे. यामुळे आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील नूतन वसाहत भागातील नागरी शहरी आरोग्य केंद्र अनेक वर्षांपासून हरवल्याने नूतन वसाहतसह आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना व लहान बालक, गरोदर मातांना प्राथमिक उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी नागरिकांना प्राथमिक उपचार घेण्यासाठी खासगी दवाखान्याकडे जावे लागते. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो.
याकडे आरोग्य विभागाचे लक्ष नसल्याने जनता व पोलिस समन्वय समितीचे जालना सहसमन्वयक ईश्वर बिल्होरे यांनी कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार दिली आहे. सदरील मंजूर आरोग्य केंद्राचा शोध घेण्याची विनंती केली आहे. यावर पोलीस निरीक्षक महाजन म्हणाले की, गुन्हेगारी नियंत्रण आणण्यात आणि कायद्याचे पालन करून घेण्यासाठी पोलीस पुढे असतात. तसेच लोकांच्या मूलभूत हक्कावर कुणी गदा आणत असेल तर पोलिस प्रशासन सक्षमपणे जनतेच्या पाठीशी उभी आहे.
महत्वाच्या बातम्या
- जेजुरी गडावर राजमाता अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा; पवारांच्या हस्ते होणार अनावरण
- ‘बिग बॉस’ फेम स्वामी ओम यांचे निधन
- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, धनजंय मुंडेंनी दिले ‘हे’ आदेश
- राकेश टीकेत यांना शेतकऱ्यांचा तुफान प्रतिसाद, महापंचायतमध्ये तुटले गर्दीचे सगळे रेकोर्ड
- ‘वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या’; ग्रेटा थनबर्ग, रिहानाला परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
