Share

गेला परमबीर कुण्या गावा! ‘माजी पोलीस आयुक्तांचा ठावठिकाणा माहित नाही’, सीआयडीचा आयोगासमोर अहवाल

Published On: 

मुंबई : ‘मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे कोठे आहेत हे माहिती नाही. त्यामुळे आयोगाने काढलेले जामीनपात्र अटक वॉरंट त्यांना बजावता आले नाही’, असा अहवाल सीआयडीतर्फे चांदिवाल आयोगासमोर देण्यात आला. त्यामुळे आयोगाने त्याची दखल घेत या प्रकरणात पुढील सुनावणी १८ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी चौकशी करणाऱ्या, हायकोर्टाचे निवृत्त न्या. कैलाश चांदिवाल यांच्या आयोगासमोर जबाब नोंदवण्यासाठी परमबीर सिंह टाळाटाळ करत आहेत. वारंवार समन्स बजावूनही ते गैरहजर राहिलेत. त्यामुळे आयोगाने त्यांच्याविरोधात या आधी दोनदा जामीनपात्र अटक वॉरंट बजावले. परंतू दुसरे वॉरंटही पोलिसांना बजावता आले नाही.

‘माजी पोलीस आयुक्त परमबीर याचा ठावठिकाणा शोधून काढण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. परमबीर यांनी ज्या डॉक्टरांकडून वेळोवेळी वैद्यकीय उपचार घेतले त्यांच्याशीही आम्ही संपर्क साधला. पण, त्यांनाही त्यांनाही त्यांचा पत्ता माहिती नाही. ते कुठे आहेत हे माहिती नसल्याने वॉरंट बजावता आले नाही’, असे सीआयडीने आपल्या अहवालात खुलासा केला.

त्यानंतर अनिल देशमुख यांचे वकील आणि देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्या वकिलांनी परमबीर यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यासह त्यांची संपत्ती जप्त करण्याचा आदेश काढावा, अशी विनंती आयोगाला केली. पण चांदीवाल आयोगाने हे दोन्ही अर्ज प्रलंबित ठेवले. यावर पुढील सुनावणी १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!