🕒 1 min read
नवी दिल्ली : व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला असंख्य मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे.
यासंदर्भात मोदींनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचं अभिनंदनही केलंय. तसंच, बायडन यांच्यासमवेत काम करत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील भागिदारीला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी संकल्पित आहे. भारत व अमेरिकेची भागिदारी आपल्यासाठी लाभदायक आहे.
My warmest congratulations to @JoeBiden on his assumption of office as President of the United States of America. I look forward to working with him to strengthen India-US strategic partnership.
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2021
My best wishes for a successful term in leading USA as we stand united and resilient in addressing common challenges and advancing global peace and security.
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2021
The India-US partnership is based on shared values. We have a substantial and multifaceted bilateral agenda, growing economic engagement and vibrant people to people linkages. Committed to working with President @JoeBiden to take the India-US partnership to even greater heights.
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2021
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. दरम्यान, हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही मोदींनी अभिनंदन केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही आहोत आंबेडकरवादी, लागू नका आमच्या नादी..सर करायची आहे आम्हाला मुंबईची गादी’
- मलिंगा, पॅटिन्सनसह मुंबई इंडियन्सने ‘या’ ७ खेळाडूंना दिला डच्चू !
- या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल; भाजप नेत्याची बोचरी टीका
- सलाम : दुर्घटनेत पत्नी गमावली, स्वतः जबर जखमी झाले मात्र रुग्णालयातही श्रीपाद नाईक ‘ऑन ड्युटी’
- ‘पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
