🕒 1 min read
गिरड : शेतकर्यांच्या हातून खोडकीड्याने सोयाबीन गेल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीची पाहणी करून शेतकर्यांना एकरी 40 हजार रुपये मदत देण्याची मागणी करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कृषी अधिकार्यांना खराब झालेले सोयाबीन भेट दिले.
समुद्रपुर तालुक्यात ऐन शेंगा लागण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकावर खोडकीडीचा व बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भव झाल्याने अचानक शेतकर्यांचे सोयाबीन पिवळे पडून वाळायला लागले आहे. कित्येक शेतकर्यांच्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
या झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करुन सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना एकरी 40 हजार रुपयाची तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकार्यांना खराब झालेले सोयाबीन पीक देऊन दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देते वेळी सुभाष चौधरी, मनोज गिरडे, निलेश खाटीक उपाध्यक्ष वासुदेव वैरागडे, अमोल मेंढूले, कवडू ब्राह्मणे, संदीप शिवनकर, राहुल गाडवे, अशोक डेकाटे यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
सरकारने अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही-शरद पवार
ताडोबातील ‘त्या’ गावातील सुटणार का समस्या ? काय ठरले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बैठकीत
कंगणावरील कारवाई नियमानुसार, यात सरकारचा काहीही संबंध नाही-शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
