Share

कंगणावरील कारवाई नियमानुसार, यात सरकारचा काहीही संबंध नाही-शरद पवार

Published On: 

दिल्ली: अभिनेत्री कंगणा राणावतवर झालेली कारवाई ही मुंबई महापालिकेने नियमानुसार केलेली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारचा काहीही संबंध नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. आतापर्यंत शिवसेनेने जी भूमिका घेतली आहे त्यावरही शिवसेना बोलण्यास पवारांनी नकार दिला आहे. दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कंगना प्रकरणाचा सरकारशी काही संबंध नाही. कार्यालयावर कारवाई मुंबई पालिकेने केली आहे. पालिकेचे काही नियम असून त्यानुसार ते कारवाई करत असतात. कारवाईचा निर्णय सरकारचा नाही तर पालिकेचा आहे. सर्व जबाबदारी पालिकेची आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

मराठा आरक्षण स्थगितीवर बोलताना शरद पवार यांनी फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं सांगितलं. अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच विरोधकांना राजकारण करायचं आहे, आम्हाला मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असं आवाहन त्यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या:

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही काँग्रेसची मानसिकता ; चंद्रकांत पाटलांची जहरी टीका

नीटच्या परीक्षेसाठी विदर्भात धावणार लालपरी, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निर्णय

मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाबाबत राज्य सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार आहे – अशोक चव्हाण

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!