टीम महाराष्ट्र देशा : साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले होते. ही प्रतीक्षा संपली असून, परभणीत शिवसेनेने आपला बालेकिल्ला राखला असून, शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव विजय झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात ही लढत झाली असून, संजय जाधव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांचा पराभव केला आहे.
परभणी लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परभणीत गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. परंतु आज पर्यंतचा इतिहास पाहता, एकदा निवडून आलेला खासदार पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावरून निवणूक न लढवता दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. मात्र शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी हा इतिहास मोडला असून त्यांनी शिवसेनेतूनच दुसऱ्यांदा उमेदवारी मीळवली आणि ते या उमेदवारी वर सार्थ ठरले आहेत.
विशेष म्हणजे, प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोल नुसार परभणीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर विजय मिळवणार असल्याचे दर्शविण्यात येत होते. परंतु परभणीसाठीचा एक्झिट पोल हा खोटा ठरला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

