टीम महाराष्ट्र देशा : साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले होते. ही प्रतीक्षा संपली असून, जालना लोकसभा मतदार संघातून जालन्याचे भजापा उमेदवार रावसाहेब दानवे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
गेल्या २० वर्षांपासून जालन्यात भाजपचे वर्चस्व आहे. रावसाहेब दानवेंनी यंदाही आपला झेंडा फडकवला आहे. जालना लोकसभा मतदार संघातभाजपाकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कॉंग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्यात लढत होती. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार विलास आवताडे यांचा पराभव केला आहे.
जालना लोकसभा मतदार संघात १९९९ पासून रावसाहेब दानवे खासदार आहेत. २००४, २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत दानवेंना अनेक अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
विशेष म्हणजे, दानवे आणि खोतकर यांच्यातील वादही चव्हाट्यावर आला होता. अर्जुन खोतकर यांनीही जालन्यातून उमेदवारी मागितली होती, परंतु दानवे विद्यमान खासदार असल्याने त्यांना प्रध्यान देण्यात आले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यास्तीतून हा वाद मिटवन्यात आला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
