टीम महाराष्ट्र देशा : मतमोजणी सुरु होताच औरंगाबादमधून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आघाडीवर होते. मात्र त्यानंतर पिछाडीवर जात ते तीन नंबरवर पोहोंचले होते. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांना पिछाडीवर टाकत खैरे पुन्हा दोन नंबरवर आले आहेत.
सध्या औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आघाडीवर आहेत. चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांना पिछाडीवर टाकत दोन नंबरवर येऊन पोहोंचले आहेत. परंतु अद्यापही खैरे यांना आघाडीवर जाण्यासाठी ३१ हजार मतांचा सामना करावा लागणार आहे.
शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे, कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील, तर अपक्ष उमेदवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यात ही टोकाची लढत झाली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

