Share

पुणेकरांनो सकाळी ११ नंतर घराबाहेर पडाल तर खबरदार; लॉकडाऊन होणार आणखी कडक

Published On: 

पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

सध्या पुण्यात राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. असे असले तरी अजूनही ही संख्या खूप कमी झालेली नाही. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे. त्यामुळे लोकांनी महत्वाची कामे असतील तर ती सकाळी ११ वाजण्याच्या आतच पूर्ण करावी. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून लॉकडाऊनची आणखी कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

पुण्यात लॉकडाऊन करण्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने नुकतीच राज्य शासनाला केली होती. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या चर्चेत आली आहे. संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ येण्यापूर्वीच आधीच खबरदारी घ्यावी, या हेतूने शहर पोलिसांनी आता नाकाबंदीची व्याप्ती वाढविली आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावे. दुपारी १२ वाजल्यापासून रस्त्यावर येणार्‍या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे.

सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मोकळीक दिली आहे. असे असले तरी नागरिकांनी आपल्या परिसरातच वाहनांचा वापर कमीत कमी करावा. सकाळी नागरिक वेगवेगळी कारणे सांगत असतात. त्यातून रस्त्यावर पोलीस आणि नागरिक यांच्यात काही वेळा वादाचे प्रसंगही येत असताना दिसून येतात. दुपारपासून रस्त्यावर आलेल्या प्रत्येक नागरिकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम आता दिसू लागला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात नव्याने १ हजार १६५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात ५ हजारांपार असलेली पुणे शहराची संख्या आता मोठ्या प्रमाणात घटली असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!