औरंगाबाद : लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या आढावा बैठकीत व्हेंटिलेटरवर चर्चा सुरू असताना. घाटीतील वेंटिलेटर बंद व खराब स्थितीत असल्याचे समोर आले. यावर भागवत कराड यांना विचारले असता. त्यांनी या विषयावर काढता पाय घेतला तसेच सर्वत्र व्हेंटिलेटर सुस्थितीत असल्याचे सांगत याप्रकरणी खापर घाटीच्या अधिष्ठाता यांच्यावर फोडले.
खडक निर्बंध लागल्यापासून दर सोमवारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामध्ये जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असतो. यावेळी विविध विषयांवर चर्चा होत असते खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्राकडून पाठवलेल्या व्हेंटिलेटर चे वाभाडे काढून मोठा घोटाळा झाल्याचे सांगितले. यावर खा. भागवत कराड यांना विचारणा केली असता त्यांनी सर्व खापर घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांच्यावर फोडत इतरत्र असलेल्या व्हेंटिलेटरचा सहारा घेतला.
पुढे बोलताना कराड म्हणाले शहराला मिळालेल्या वेंटिलेटर पैकी सामान्य रुग्णालय तसेच इतर रुग्णालयातील व्हेंटिलेटर त्यांनी तंत्रज्ञाला बोलवत सुस्थितीत करून वापरात आणले परंतु अधिष्ठाता यांनी असेना करता व्हेंटिलेटर सुस्थितीत नसल्याचे सांगत स्वतःचे अंग झटकले ची प्रतिक्रिया कराड यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

