Share

#lockdown : …म्हणून रेशन दुकानदारांची डोकेदुखी वाढली

Published On: 

सोलापूर : कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन दरम्यान कोणीही उपाशी राहू नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून प्रती नागरिकांप्रमाणे पाच किलो मोफत तांदूळ तीन महिने देण्याची घोषणा केंद्रसरकारकडून करण्यात आली आहे.

मात्र केशरी कार्डधारक वगळल्याने ज्यांना पूर्वी लाभ मिळत आहे, त्यांनाच मोफत धान्य आणि ज्यांना लाभ मिळत नाही ते पुन्हा वंचित अशीच स्थिती निर्माण झाली आहे. आम्हाला धान्य काय नाही? असा जाब विचारण्यासाठी लॉकडाऊन मोडून लोक घोळक्याने रेशन दुकानात येऊ लागल्याने दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. असे वृत्त ‘सकाळ’वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलं आहे.

कार्डधारकांना आता पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीएचमधील १ लाख ६५ हजार ५१३ केशरी कार्डधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. आम्हाला धान्य का देत नाही? नियमित धान्य वाटपातील धान्य आल्याने हे वाटप सुरू आहे. मोफतचा तांदूळ अद्यापही रेशन दुकानात आलेला नाही. आम्हाला मोफतचा तांदूळ द्या यासाठी कार्डधारक दुकानांमध्ये येऊ लागले आहेत. म्हणून सोलापुरातील शिवगंगानगर, गांधीनगर, जेलरोड पोलिस ठाणे या परिसरातील कार्डधारकांनी समूहाने एकत्रित येत दुकानदारांकडे विचारणा करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, सोलापूर शहरात ३१४ रेशन दुकाने असून या सर्वांनी ही समस्या भेडसावू लागली आहे. अंत्योदय योजनेतील ६ हजार ४९ तर प्राधान्य कुटुंब योजनेतील ९० हजार १३३ अशा एकूण ९६ हजार १८२ कार्डधारकांनाच नियमित धान्य मिळत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!