Share

लॉकडाऊन 4.0साठी अमित शहांच्या बैठकांवर बैठका, नवीन अटी व नियम लागू होण्याची शक्यता

Published On: 

नवी दिल्ली : येत्या रविवारी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्याची घोषणा केली आहे. याबाबत लवकरच निर्देश येण्याची शक्यता आहे. कारण शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्याबाबत दिवसभर विविध बैठका घेतल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी चौथ्या टप्यातील लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी या टप्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. या लॉकडाऊनचे स्वरूप हे वेगळे असणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठका घेतल्या. नॉर्थब्लॉकमध्ये अमित शाह तब्बल पाच तास उपस्थित होते. या सर्व बैठकांना त्यांच्यासह गृहसचिव अजय भल्लाही उपस्थित होते. चौथ्या लॉकडाऊनमध्ये संपूर्णपणे नवे नियम बनवण्यात आले असल्याचं सांगण्यात आले आहे.

दरम्यान राज्य सरकारनेही लॉकडाऊन 4.0 ची तयारी सुरु केली आहे. जो पर्यंत केंद्राकडून नवीन नियम व अटी येत नाहीत तो पर्यंत राज्य सरकार लॉकडाऊनबाबत अधिकृत घोषणा करणार नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीत 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय झाला. मात्र याची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या 

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा ; १ लाख कोटींचं पॅकेज जाहीर

#Corona : खेड तालुक्यात सापडला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!