पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी राजाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावाच्या विश्वनाथ पाताळे या शेतकऱ्यांने 3 एकर कलिंगडाची लागवड केली. मात्र राज्यभर लॉकडाऊन असल्याने हातातोंडाशी आलेली कलिंगड शेतावर सडत आहेत.
शेतावर काम करायला मंजूर येत नाहीत तर जवळपासच्या सर्व बाजारपेठा बंद आहेत, यामुळं लाखोंच नुकसान झालं आहे. एकंदरीत कष्ट करून कमावलेल्या पिकाची माती होताना शेतकऱ्याला उघड्या डोळ्यांनी बघावं लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘एकरात कलिंगडाची लागवण केली आहे. आणि याला खर्च आहे २ लाख रुपये झाला आहे. मात्र सध्या लॉकडाउन असल्यामुळे बाजारात विक्रीला जात नाही आणि शेतात सडून जात आहे. मजूर मिळत नाही बाजारपेठ मिळत नाही, म्हणून शेतकरी हतबल आहे. खर्च आहे २ लाख रुपये आणि किंमत आता ५० हजार बी होत नाही सर्व माळ सडून गेलेला आहे आणि शेतकरी आर्थिकरित्या कंगाल झालेला आहे,’ अशी प्रतिक्रिया शेतकरी विश्वनाथ पाताळे यांनी दिली आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, ‘सरकारकडे मागणी एवढीच की काहीतरी नुकसान भरपाई देईल शेतकऱ्याला म्हणून डोळे वर करून बसलेला आहे,’ असं विश्वनाथ पाताळे यांनी सांगितले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

