Share

…तरच ३० एप्रिलनंतर लॉकडाउनमधून बाहेर पडता येईल; लॉक डाऊन ३० एप्रिलच्याही पुढे जाण्याची शक्यता

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची सांख्य वाढली आहे. त्यात झाकण्यासारख काही नाही. आपण आपल्या परीने सर्व प्रयत्न करत आहोत. त्यामुळे घाबरायचे कारण नाही. पण ही बाब चिंतेची आहे, त्यामुळे खबरदारी घ्यावी. महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करत आहे. आता समोरून रुग्ण ३३ हजारच्या आसपास चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये १००० जण COVID 19 बाधित आहेत. मात्र ते आता बरे होत आहेत. त्यांच्यामध्ये सुरवातीची लक्षण होती, त्यामुळे ते आता बरे होत आहेत. मृतांची संख्या वाढत आहेत. उशिरा उपचारासाठी जे आले त्यांचा मृत्यू झाला.

तसेच नागरिकांनी खबरदारी घेईला पाहिजे. मास्क लावलं पाहिजे, घरातच राहायचं आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला घरात राहणे आवश्यक आहे. कोरोना पसरतोय हे जगजाहीर आहे. त्यामुळे 14 तारखेनंतरही लॉकडाऊन कायम ठेवणार आहे. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मुंबई पुण्यातील रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र शेतीच्या कामांमध्ये लॉकडाऊन आडवा येणार नाही. शेतीच्या वस्तू , अन्नधान्य , जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे मिळतील. त्यामुळे गडबडून गोंधळून जाऊ नका.

पुढील सूचना या वेळोवेळी दिल्या जातील. विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योग, कारखाने कधी सुरु होणार याबाबत विचार, चर्चा सुरु आहेत. त्यामुळे लवकरच आपण या सर्व परिस्थितीवर मत करू शकतो. आज देश एकटवलेला आहे. असाच देश एकत्र राहिला तर आपण महासत्ता बनू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

किमान ३० पर्यंत –

राज्यात १४ एप्रिलनंतरही लॉकडाउन कायम राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ही घोषणा केली. लॉकडाउनचा हा टप्पा १५ एप्रिलपासून सुरु होऊन ३० एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन कायम राहील असे त्यांनी सांगितले.

तसेच , “हा लॉकडाउन कधीपर्यंत चालणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ते तुमच्या हातामध्ये आहे. शिस्त तुम्ही पाळली पाहिजे. आपल्याला करोना व्हायरसची साखळी तोडायची आहे. तरच आपण यातून लवकर बाहेर पडू. आपण हा साखळदंड तोडूच” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन राहील हे सांगताना त्यांनी किमान या शब्दावर विशेष भर दिला. भाजीमंडई किंवा अन्य कुठेही तुम्ही गर्दी केली नाही तरच ३० एप्रिलनंतर लॉकडाउनमधून बाहेर पडता येईल असे त्यांनी सांगितले. किमान शब्द वापरताना त्यांनी नागरिकांना शिस्त पाळण्याचं आवाहन केलं. करोनाबाधितांची संख्या वाढत राहिली तर कदाचित ३० एप्रिलनंतरही लॉकडाउन कायम राहू शकतो. त्यामुळे हे लॉक डाऊन उठवण्याबाबतचा निर्णय हा त्यावेळची परिस्थिती बघूनच घेतली जाणार आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!