टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बुधवारी म्हणजेच १८ ऑक्टोबरपासून पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान बुधवारी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यभरातील जिल्ह्यामध्ये संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांच्या सत्कार समारंभांच आयोजन करण्यात आलं आहे. तर आधीच सरकारकडून कर्जमाफीच्या अंमलबजावणीला उशीर झाल्याची ओरड करण्यात येत होती. मात्र बुधवारपासून जरी कर्जामाफीचे वितरण केले जाणर असले तरी दिवाळीमुळे गुरुवार ते रविवार सलग चार दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्यासाठी सोमवार म्हणजे आठवडाभाराची वाट पहावी लागू शकते.,
१८ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापुर्वी प्रत्येक जिल्हयातील पहिल्या फेरीतील पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचे नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याशिवाय योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना नंतर स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रणेमार्फत प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमेच वाटप केल जात असतानाही भाजप सरकारकडून सत्कार समारंभ आयोजीत केले जात असल्यामुळे भाजप आपल्या परंपरेप्रमाणे मोठा इव्हेंट करत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी?
वाशिम – 45 हजार 417
अकोला – 1 लाख 11 हजार 625
बीड – 2 लाख 8 हजार 480
चंद्रपूर – 99 हजार 742
गोंदिया – 68 हजार 290
मुंबई शहर – 694
मुंबई उपनगरे – 119
अहमदनगर – 2 लाख 869
जळगाव – 1 लाख 94 हजार 320
लातूर – 80 हजार 473
नागपूर – 84 हजार 645
औरंगाबाद – 1 लाख 48 हजार 322
सोलापूर – 1 लाख 8 हजार 533
यवतमाळ – 2 लाख 42 हजार 471
अमरावती – 1 लाख 72 हजार 760
भंडारा – 42 हजार 872
धुळे – 75 हजार 174
बुलडाणा – 2 लाख 49 हजार 818
गडचिरोली – 29 हजार 128
नाशिक – 1 लाख 36 हजार 569
परभणी – 1 लाख 63 हजार 760
रत्नागिरी – 41 हजार 261
सिंधुदुर्ग – 24 हजार 447
जालना – 1 लाख 96 हजार 463
नांदेड – 1 लाख 56 हजार 849
उस्मानाबाद – 74 हजार 420
पुणे – 1 लाख 83 हजार 209
सांगली – 89 हजार 575
हिंगोली – 55 हजार 165
कोल्हापूर – 80 हजार 944
नंदुरबार – 33 हजार 556
पालघर – 918
रायगड – 10 हजार 809
सातारा – 76 हजार 18
ठाणे – 23 हजार 505
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

